चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : विद्या मंदिर न्हावेली येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर गावडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर कवायत व लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.यानंतर झालेल्या बालसभेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शालेय स्पर्धेतून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय समितीच्या वतीने शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री.दळवी यांनी शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्र माझाचे प्रतिनिधी जयसिंग हाजगुळकर,रमेश गावडे,चंद्रकांत सुभेदार,सचिन पेडणेकर,अंगणवाडी सेविका संजीवनी पाडले,आशा सेविका शांता देवरमनी,निखिता पेडणेकर,संजना पेडणेकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य,ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या अध्यापिका विद्या शिनोळकर यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments