(चंदगडला हरित करण्याच्या मोहिमेत संतोष मळविकर अग्रस्थानी,झाडांचे प्रेम जपणाऱ्या वकिलाचा वन विभागाकडून गौरव)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात सन 2024-25 मधील पावसाळ्यात तब्बल एक लाख रोपांची निर्मिती करून मोफत वाटप व वृक्ष लागवडीचा यशस्वी कार्यक्रम राबविल्याबद्दल वनपरिक्षेत्र कार्यालय, चंदगडतर्फे ऍड. संतोष मळविकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष हळदणकर, दत्तू पेडणेकर उपस्थित होते.
परिक्षेत्र वन अधिकारी टी. आर. गायकवाड यांनी या ऍड. मळविकर यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करताना"भविष्यातही वृक्ष लागवड व जनजागृतीसाठी मळविकर यांचा सहभाग लाभावा" अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी ऍड. मळविकर म्हणाले, "माझ्या जीवनात मी 33 देश पाहिले, पण भारतासारखा देश कुठेच नाही. चंदगड म्हणजे स्वर्ग आहे, परंतु वृक्षतोडीचा फटका आपल्याला बसला आहे. आता झाडे लावण्याइतकेच त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत मी एक लाख रोपांची निर्मिती केली असून आता आणखी एक लाख झाडे जगवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे."
सूत्रसंचालन व आभार श्री. कृष्णा डेळेकर परिमंडळ वन अधिकारी यांनी केले. यावेळी श्रीमती वर्षदा कानकेकर परिमंडळ वन अधिकारी, मिरवेल सागर पाटील , संपत पेडणेकर ,दयानंद गावडे ,प्रकाश गावडे, संभाजी मळवीकर यांच्यासहित वनरक्षक, वनसेवक, वन्यजीव बचाव पथक सदस्य उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments