कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील जनता,वकील आणि पक्षकार यांचा ४२ वर्षांचा संघर्ष,असंख्य आंदोलने, त्याग आणि प्रतीक्षेची अखेर आज स्वप्नपूर्ती झाली. कोल्हापूरात मुंबई हायकोर्टाच्या सर्कीट बेंचचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.हा क्षण कोल्हापूरकरांचा न्याय्य लढ्यासाठीचा विजयी सोहळा ठरला कोल्हापूरात या निमित्ताने न्यायदानाच्या ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ झाला आहे.सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीबरोबरच कायदेशीर पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चालना मिळणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती महाराज तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बांधव सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments