Type Here to Get Search Results !

महादेवराव बी.एड. कॉलेजच्या कारभाराची चौकशी व्हावी

(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्यावतीने समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांना निवेदन)


कोल्हापूर/प्रतिनिधी : महादेवराव बी.एड. कॉलेज तुर्केवाडी यांच्यामार्फत अनुसूचित जाती मधील अनेक विद्यार्थ्याकडून फी स्ट्रक्चर सोडून जादा फी घेतल्याबद्दल अनेक प्रकारच्या तक्रारी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कोल्हापूर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्याकडे देण्यात आलेल्या होत्या.त्यानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची महादेवराव बी.एड कॉलेजकडून पिळवणूक,मानसिक त्रास व आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप केला जातं आहे.


त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांची भेट घेऊन याविषयी लेखी तक्रार मांडण्यात आल्या.यामध्ये असे म्हटले आहे कि,शासनाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत विद्यार्थ्याकडून नियमबाह्य फी वसूल केल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.


त्याचप्रमाणे जिल्हा सचिव माळगे म्हणाले की,या कॉलेजची तीन वर्षाची चौकशी करून मिळावी व संबंधित कॉलेजवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करावी,असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने आंदोलन, उपोषण तसेच मोर्चे काढण्याचा इशारा सतीशदादा माळगे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी उपस्थित सचिन मंतेर, संबोधी कांबळे तक्रार निवारण समिती हातकणंगले, अशोक चव्हाण,गजानन कांबळे कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments