(काजू उद्योगाला शासनाचा पाठिंबा-शेतकरी व उद्योगकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय लवकरच,मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा)
चंदगड/प्रतिनिधी : काजूच्या माध्यमातून शेतकरी व उद्योगकांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणे ही शासनाची प्रमुख भूमिका आहे. काजू फळ लागवडीसाठी जातींची अधिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, याबाबत ठोस निर्णय लवकरच आणला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री नितेश राणे यांनी चंदगड येथे झालेल्या उद्योगकांच्या बैठकीत दिले.
मंत्री राणे म्हणाले की, कोकण व चंदगडातील काजू उद्योगाला बर्डरक्सारखेच महत्त्व दिले जाणार आहे. शेतकरी व उद्योगकांनी मिळून संस्था स्थापन करून व्यवसाय पुढे न्यावा, शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल. बाजारपेठेत आपला काजू अधिक प्रभावीपणे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात येणार आहेत.काजू उद्योग नैसर्गिकरित्या नफ्यात आहे, मात्र त्याला शासनाच्या बळकटी पाठबळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या प्रास्ताविकात पन्न विभागाचे सहसंचालक डॉ. सुभाष बुचडे यांनी कोल्हापूर व कागल तालुक्यातील काजू उद्योगाचा आढावा मांडला. प्रा. दीपक पाटील यांनी काजू उद्योग तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो असे मत व्यक्त केले. तसेच काजू परतावा तत्काळ देण्याची मागणी यावेळी मांडली गेली.या बैठकीत चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाची प्रक्रिया, अडचणी व समस्यांवर सखोल चर्चा झाली.याप्रसंगी प्रा. आनंद मळवी, चव्हाण सुतार, तानाजी तुपारे, लक्ष्मणराव गावडे, प्रा. गणेश मळवी, नामदेव माळी, अजित गावडे, गोपाळ गावडे, राजेंद्र पाटील, गुरु बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments