(माजी सैनिक निर्जर प्रभाकर पाटील यांच्याहस्ते उद्घाटन)
चंदगड/प्रतिनिधी : शिवणगे येथील मराठी विद्यामंदिरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन माजी सैनिक निर्जर प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील होते.स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय कार्यक्रमानंतर शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून त्यासाठी स्टील फर्निचरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या योगदानाबद्दल उदघाटक निर्जर पाटील यांचा सहपत्नींसह सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना शिक्षक अनंत पाटील यांनी शैक्षणिक उन्नतीसाठी खर्च केलेल्या ५० हजार रुपयांचा, देणगीदारांचा व समितीच्या प्रयत्नांचा उल्लेख करून सर्वांचे आभार मानले. उदघाटक निर्जर पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत सातत्याने सहभागी राहण्याचे आश्वासन दिले. तर जोतिबा सांबरेकर यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.यावेळी नुकत्याच निवड झालेल्या उपाध्यक्ष सौ. अस्मिता अमित पाटील यांचा सत्कार सरपंच संतोष शिवणगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. शाळा समिती सदस्य सतीश पाटील यांनी शाळेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली व सहकार्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राणी पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य नारायण पाटील, एकनाथ मोरे, सौ. सुहासिनी पाटील, सौ. रजनी पाटील, सुरेश पाटील, सौ. रंजना पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Post a Comment
0 Comments