आजरा/प्रतिनिधी : शेतकरी आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन आजऱ्यामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. या महामार्गमुळे शेतकऱ्यांच आणि पर्यावरणाची होणारी हानी याबद्दल महत्व पटवून देत मोर्चातुन प्रशासन व सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी धो-धो कोसळत असणाऱ्या पाऊसामध्ये शेतकरी वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मोर्चामध्ये आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी, विजय देवणे, मुकुंददादा देसाई, विद्याधर गुरबे,संपत देसाई,सुनील शिंत्रे, अतुल दिघे, अंजना रेडकर, अमर चव्हाण, अल्बर्ट डिसोझा, दशरथ घुरे, संजय तरडेकर, राजेंद्र गड्यांनवर, संभाजी पाटील, युवराज पोवार यांच्यासह या विभागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments