Type Here to Get Search Results !

चंदगडच्या महसूल भवनची तात्काळ दुरुस्ती करा-दिलीप चदगडकर

 


(चदगडच्या महसूलभवन सदर्भात नगरसेवक दिलीप चदगडकर यांचे प्रशासनाला निवेदन)


चदगड/प्रतिनिधी : चदगड येथील महसूल भवनची झालेली दुरवस्था पाहून चदगडचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते दिलीप चदगडकर यानी जिल्हाधिकारी अमोल येडगे व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन दुरूस्तीसदर्भात निवेदन दिले.या निवेदनात असे म्हटले आहे कि,महसूल भवनाची दुरवस्था दयनीय झाली असून त्याची आजतागायत दुरुस्ती करण्यात आलेली नाही.




चदगड तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महसूल भवनमध्ये आजूबाजूच्या खेड्यातील लोक कामासदर्भात येत असतात.पण चदगड महसूल भवनाच्या दयनीय अवस्थेमुळे येणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.महसूल भवन असून नसल्यासारखे झाले आहे.चदगडच्या महसूल भवनाच्या दयनीय अवस्थेमुळे सामान्य नागरिकाची गैरसोय होत आहे.तसेच या दयनीय अवस्थेमुळे स्वतःचे महसूल भवन असून सुद्धा या गैरसोयीमुळे तेथील तलाठी व कर्मचाऱ्यांनी खाजगी जागेत आपले कार्यालय थाटले आहे.त्यामुळे तात्काळ याकडे लक्ष देऊन विषय मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

Post a Comment

0 Comments