चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : आपल्या कॉलेज जीवनातील मित्र सुरेश किरमटे याचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना 'साथ मैत्रीची' या व्हाट्सअप ग्रुप कडून मदत करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.मित्र-मैत्रिणी गेट - टुगेदर न करता किरमटेवाडी ( ता.चंदगड ) येथील त्यांचा घरी जाऊन त्यांचा पत्नीच्या नावे 20,000 रुपये फिक्स डिपॉजिट व रोख 5000 रुपये अशी एकूण 25000 रुपयेची छोटीशी मदत किरमटे यांच्या पत्नी यांच्याकडे सुपूर्द केली.
किरमटे कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी होत या मित्र परिवारानी सांत्वन केले.या मदतीसाठी किरमटे परिवाराने कृतज्ञता वक्त करून सर्वांचे आभार मानले.यावेळी बुधाजी कांबळे,सुरेश दळवी,शिवाजी गावडे,कल्पना कुंभार,संध्या पेडणेकर,गीता दळवी,विजय पाटील,संभाजी गावडे आदी मंडळी उपस्थित होते. 'साथ मैत्रीची' या व्हाट्सअप ग्रुपची आर्थिक मदत आणि मैत्रीची अनोखी ओळख माणुसकी जपणारे उत्तम उदाहरणं असून आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments