Type Here to Get Search Results !

बाबुराव वरपे यांच्या पुढाकारातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत प्रदान.

कोल्हापूर/प्रतिनिधी : भटक्या व वंचित समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेले वि.मं. बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव वरपे यांनी पुन्हा एकदा समाजहिताचा आदर्श ठेवला आहे. पी.एम.श्री विद्यामंदिर गोरंबे, ता. कागल येथे नुकतेच दाखल झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत देऊन त्यांच्या शिक्षण प्रवासाला बळकटी दिली.


या उपक्रमाचे वितरण कार्यक्रम शालेय समिती, शिक्षकवृंद, केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद कोल्हापूरचे अधिकारी तसेच वन विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरवणारा हा क्षण, शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, या संदेशाने भारलेला होता.



श्री.वरपे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “एक पाऊल भटक्यांच्या शिक्षणासाठी, म्हणजेच भारतमातेच्या प्रगतीसाठी.” त्यांच्या या दृष्टिकोनातून समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त करण्याचा प्रयत्न होत आहे.या उपक्रमामुळे भटक्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी नवीन प्रेरणा निर्माण झाली असून, समाजात “समर्पणातून परिवर्तन” या विचाराची ठोस पेरणी झाली आहे.

Post a Comment

0 Comments