Type Here to Get Search Results !

भीमा कोरेगाव संदर्भातील खोटे गुन्हे माघे घ्या-रिपब्लिकन पार्टी व ब्लॅक पँथर


कोल्हापूर/प्रतिनिधी : भीमा कोरेगाव संदर्भात कोल्हापूर येथील  03 जानेवारी 2018 च्या आंदोलनातील साधारणता 1800 आंबेडकरी कार्यकर्ते यांचेवर गुन्हे दाखल आहेत.ते गुन्हे मागे घेणेसंदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची रिपब्लिकन पार्टी व ब्लॅक पँथर पक्षाकडून भेट घेण्यात आली.


भीमा कोरेगाव आंदोलनातील कार्यकर्ते यांना पोलिसाकडून धरपकड सुरु करण्यासाठी नोटीस जात आहेत त्या तात्काळ थांबवण्यासाठी तात्काळ जिल्हाधिकारी व जिल्हापोलीस प्रमुख यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे व ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी निवेदनातून मागणी केली.यावेळी पालकमंत्री यांनी तात्काळ संबंधिताना योग्य त्या सूचना देतो असे सांगून सदर गुन्हे शासन स्तरावर मागे घेणेसंदर्भात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग  जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्याचाही तात्काळ अहवाल देण्याचे देखील आश्वासन दिले.यावेळी शिष्टमंडळात जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी जी भास्कर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाळू वाशीकर,सुखदेव बुद्धिहाळकर,जयसिंग पाडळीकर,गुणवंत नागटिळे,प्रदीप मस्के,दत्ता मिसाळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments