चंदगड/प्रतिनिधी : सर्जेराव पाटील रा.कागल या इसमाकडून फेसबुक वरती मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे फोटो व्हायरल करण्यात आले होते.ज्यामुळे सर्वत्र मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणात भावना भावना दुखावल्या गेल्या आहेत.
समाजात वावरत असताना सर्वांनी मुक्तपणे वागावे.पण एखाद्या कृत्यामुळे आपल्या समाजाला मान खाली घालावी लागणार नाही यासाठी मर्यादा ठेवून कायदयाच्या कक्षेत काम करणे गरजेचे आहे.पण हल्ली, कोणीही उठतंय आणि सोशल मीडियावर चुकीच्या व वाईट प्रकारच्या पोस्ट टाकत असल्यामुळे त्याचे चांगले वाईट परिणाम पुढं दिसून येतात.त्यामुळे असाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे.मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने समाजकंटक सर्जेराव पाटीलवर तात्काळ गुन्हा नोंद करून योग्य कारवाई करण्यात यावी.या कृत्य करणारे व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी चंदगडच्या मुस्लिम समाजाकडून पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
Post a Comment
0 Comments