Type Here to Get Search Results !

भित्तिपत्रक हे विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे प्रभावी साधन-डॉ. गोरल


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या एम.कॉम. विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्याहस्ते करण्यात आले.या प्रसंगी बोलताना डॉ. गोरल म्हणाले की, “भित्तिपत्रक हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे प्रभावी साधन आहे. लेखनकौशल्य, विचारमंथन आणि सामाजिक जाणिवा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले.त्यांनी एम.कॉम. विभागाच्या भित्तिपत्रक कार्याचा हेतू स्पष्ट करत विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. प्रा. महादेव गावडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला प्रा. एस. के. सावंत, प्रा. पूजा देशपांडे, प्रा. युवराज हेरेकर, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील आदी प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments