(२०१४ मध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर मारहाण करून खोटे गुन्हे दाखल; न्यायालयाचा पोलिसांना चोप,सात खटल्यांपैकी चौथा खटला निकालात; सर्व आरोपी निर्दोष ठरल्याने मराठी लढ्याला बळ)
बेळगाव/सीमाभाग प्रतिनिधी : सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेल्या येळ्ळूर गावातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ हा फलक हटवल्यानंतर शांततेत आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कर्नाटकी पोलिसांनी मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणातील ३२ नेते-कार्यकर्त्यांची दुसऱ्या एमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या खटल्यात एकूण ४२ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला, तर सात जणांना आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. गुरुवारी लागलेल्या निकालामुळे उर्वरित ३२ जणांची पूर्ण निर्दोष मुक्तता झाली.
निर्दोष मुक्त झालेले कार्यकर्ते पुढीलप्रमाणे :
अर्जुन गोरल, शिवाजी कदम,चांगदेव देसाई, अनंत चिट्टी, वृषेशण पाटील, सामाजी हट्टीकर, सुनील धामणेकर, परशराम कुंडेकर, महेश कानशिडे, विशाल गोरल, अमर पाटील, भैरू कुंडेकर, किरण उडकेकर, मोहन कुगजी, भरमा हलगेकर, रमेश घाडी, उदय पाटील, विलास पाटील, सागर कुंडेकर, बाबू कणबरकर, रोहित धामणेकर, अनिल धामणेकर, चांगाप्पा मिसाळे, मिथुन शहापूरकर, सागर पाटील, किशन सांबरेकर, सूरज घाडी, विशाल टक्केकर, अमोल जाधव, राजू तोपिनकट्टी, अनिल कंग्राळकर, सागर काकतकर, संतोष मेलगे, बाबू मेलगे, मिंटू बेकवाडकर, अरुण गोरल, सुहास पाटील, राहुल अष्टेकर, उमेश सांबरेकर, योगेश मजूकर, अमित पाटील आणि प्रवीण परशराम बागेवाडी.
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलक प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या सात खटल्यांपैकी चौथा खटला निकालात आला आहे. याआधीच तीन खटल्यांत येळ्ळूरवासीयांची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यामुळे एकूण चार प्रकरणांत ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे. उर्वरित तीन खटल्यांतही निर्दोष सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.या निकालामुळे कर्नाटकी पोलिसांच्या अन्यायकारक कारवाईवर न्यायालयीन शिक्का बसला असून, मराठी भाषिकांच्या न्यायलढ्याला नवी ताकद मिळाल्याचे सीमाभागात समाधानकारक वातावरण आहे.
Post a Comment
0 Comments