Type Here to Get Search Results !

कोवाड येथे ओपन जिमचा उदघाटन सोहळा संपन्न


(जिल्हा क्रीडा नियोजन मंडळातून कोवाड येथे ओपन जिमसाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर,मान्यवरांच्या उपस्थितीत ओपन जिमचे उद्घाटन सोहळा उत्साहात,ग्रामपंचायत,आजी-माजी सैनिक संघटना व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग)


कोवाड (ता. चंदगड) : जिल्हा क्रीडा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोवाड गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या ७ लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या ओपन जिमचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांच्याहस्ते पार पडले.या उपक्रमामुळे कोवाड परिसरातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्यसंपन्न जीवनशैली अंगीकारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


या सोहळ्यास माजी सभापती यशवंत सोनार, भावकु गुरव, संतोष पाटील, अनिल शिवणगेकर आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अनिता भोगण,उपसरपंच बाळू व्हन्याळकर, ग्रामपंचायत सदस्या रंजना पाटील,रेश्मा वांद्रे, नुसरत मुल्ला, ग्रामसेवक श्रीकांत सोनार तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उद्घाटन सोहळ्यात आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य विशेषत्वाने सहभागी झाले. मान्यवरांनी ओपन जिमच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्यवृद्धीसाठी नवा मार्ग खुला झाल्याचे सांगितले. युवकांबरोबरच महिलांनी व ज्येष्ठांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.कोवाड येथे आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे ओपन जिम उभारल्यामुळे ‘निरोगी गाव – तंदुरुस्त गाव’ या संकल्पनेला चालना मिळणार असून, ग्रामस्थांच्या आरोग्यदायी आयुष्याचा पाया अधिक भक्कम होणार आहे.

Post a Comment

0 Comments