चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरेवाडीतील वृषालीने अत्यंत मेहनतीने यश संपादन करत समाज कल्याण विभागाच्या 'निरीक्षक' पदी मजल मारली आहे.जिद्द,चिकाटी व आपल्या एकाग्र बुद्धीमतेच्या जोरावर अभ्यास करून सामान्य कुटूंबातील वृषालीने सरकारी अधिकारी बनत एक नवा आदर्श युवा वर्गाला घालून दिला आहे.वृषाली उत्तम पाटील हिची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या निरीक्षक पदी निवड झाल्याने पोरेवाडी गावासह तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वृषाली ही सामाजिक कार्यकर्ते आणि दौलतचे संचालक व घटप्रभा शिक्षण प्रसारक मंडळ आमरोळीचे उपाध्यक्ष आणि अडकूर भागातील एक प्रगतशिल शेतकरी उत्तम धोंडीबा पाटील यांची जेष्ठ कन्या आहे.श्री.रामलिंग हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य आर. डी. पाटील यांची ती पुतणी असून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्राचार्य आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण घेतांना स्पर्धा परीक्षेचा पाया रचला गेला.MPSC मधून घवघवीत यश मिळविणारी ती गावातील व पंचक्रोशीतील पहिलीच मुलगी असल्याने तालुक्यात तिचे विशेष कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments