गारगोटी( प्रतिनिधी ) : वि. मं. अंतिवडे या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रवींद्र बच्चाराम वाघमारे यांची तर उपाध्यक्षपदी सुनीता श्रीकांत कांबळे व शिक्षण तज्ज्ञ म्हणून गोपाळ कांबळे यांची निवड करण्यात आली.
यासंदर्भात अंतिवडे येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.नूतन निवड झालेल्या मान्यवरांचा माणूस फाउंडेशन च्या संचालिका व अंतिवडे ग्रामपंचायत सदस्या संज्योत धम्मरक्षित यांच्याहस्ते कोल्हापूरी फेटा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष ठाकूर होते.
यावेळी बोलताना संज्योत धम्मरक्षित म्हणाल्या की,आजचा विध्यार्थी हे आपल्या सक्षम भारताचे भविष्य आहे, याची सुरुवात ग्रामीण भागातून होत असते त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि याची सुरवात रवींद्र वाघमारे यांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष निवडीने झाली असल्याचे मत अंतिवडे ग्रामपंचायतच्या सदस्या संज्योत धम्मरक्षित यांनी मांडले.
यावेळी बोलताना धम्मरक्षित पुढे म्हणाले की, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी जमेल ती मदत निश्चितपणे आपल्या पाठीशी उभी करण्यासाठी माणूस फाउंडेशन परिवार आपल्या सोबत असल्याचे सांगितले.
या सत्काराला उत्तर देताना शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र वाघमारे म्हणाले की, गावातील तरुण, मुंबई पुणे येथे वास्तव्यात असणारे गावातील होतकरू युवा वर्ग यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि समाजातील सर्व स्तरातून सहकार्य घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी नूतन शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ज्ञ म्हणून निवड झालेल्या गोपळ कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजीराव पाटील, वैभव कांबळे, संतोष कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कांबळे यांनी केले तर शेवटी आभार वेदांत कदम यांनी मानले.
Post a Comment
0 Comments