सिनेसृष्टी वार्ता : भारतीय चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी दक्षिण भारतातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर करण्यात आला आहे. अलिकडेच, भारत सरकारने २०२३च्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली होती. त्यानंतर मोहनलाल यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. मोहनलाल हे जेष्ठ अभिनेते असून त्यांनी चित्रपट सृष्टीत भरीव असे योगदान दिले असून त्यांच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार ही घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. मोहनलाल यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
Post a Comment
0 Comments