आ.शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश
चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गेली ७ वर्षे प्रलंबित असलेल्या मोर्ले-मिरवेल रस्त्यास अखेर वनविभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. मोर्ले-मिरवेल मार्गासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील हे वनखात्याकडे 2019 पासून पाठपुरावा करत होते. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ.पाटील यांनी गेली ८ महिने या प्रलंबित मार्गासाठी जोर लावला होता. यासाठी त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन खात्याचे मंत्री गणेश नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. चंदगड सारख्या ग्रामीण तालुक्याच्या विकासासाठी हा मार्ग कसा महत्त्वाचा हे त्यांनी पटवून दिले. त्याचीच फलश्रुती म्हणून अखेर वनखात्याने मोर्ले-मिरवेल रस्त्यास अखेर मंजूरी दिली.
या मार्गामुळे भविष्यात चंदगड तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याशी व गोव्याशी जोडला जाणार आहे. तसेच तिलारी घाट मार्गासाठी हा पर्यायी रस्ता होणार असून यामुळे वाहतूक जलद गतीने होण्यास मदत होईल. तसेच चंदगड तालुक्यातील व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे. या रस्त्यांचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments