चंदगड/प्रतिनिधी : जगभरातील साहित्यप्रेमी आजही ज्यांच्या लेखणीचे सामर्थ्य आणि शब्दांच्या आधारे मानवी भावभावनांचा गुंता उलगडणारी प्रतिभा अनुभवतात, अशा महान नाटककार व कवी विल्यम शेक्सपियर यांना *एक अवलिया* म्हणून गौरवले जाते असे प्रतिपादन खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित *भिंती पत्रकाचे उद्घाटन* आणि *विल्यम शेक्सपियर : एक अवलिया* या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, शेक्सपियरने एकूण ३७ नाटके, १५४ सॉनेट्स, आणि इतर अनेक काव्यरचना केल्या, ज्या आजही अभ्यासल्या जातात. हॅम्लेट, मॅकबेथ, किंग लिअर, ओथेल्लो, आणि रोमिओ अँड ज्युलिएट यासारख्या नाटकांमधून ते मानवी मनाच्या खोल अंतरंगात डोकावले. त्यांच्या लेखणीतून साकारलेली पात्रं ही दैवी नसून मानवी स्वभावाचे वास्तव चित्रण करणारी आहेत — द्विधा मनोवस्था, लोभ, प्रेम, सूड, सत्ता, आणि नैतिक संघर्ष या साऱ्या भावनांना त्यांनी प्रगल्भतेने साकारले असे मत प्रा. आर. पी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले महात्मा फुले जु. कॉलेज, कार्वे येथील माजी प्राचार्य प्रा. एस. व्ही. गुरबे यांनी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील कौशल्य आत्मसात केल्यास उत्तम व्यवसाय व नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या विविध संधी विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आर. के. तेलगोटे यांनी केले तर या कार्यक्रमाचे संयोजन इंग्रजी विभागाचे डॉ. एन. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रतीक्षा गावडे हिने मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. के. एन. निकम, डॉ. आर. ए. कमलाकर व प्रा. व्ही. के. गावडे उपस्थित राहिले
Post a Comment
0 Comments