(महाराष्ट्र माझा 24 चे संपादक ज्ञानेश्वर पाटील यांचा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने होणार सन्मान,जनता संघर्ष न्यूज चॅनेलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा)
सोलापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील जनता संघर्ष न्यूज चॅनेलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा २३ नोव्हेंबर,२०२५ रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाला दिशा देणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमात पुणे येथील नावाजलेले पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.पाटील हे महाराष्ट्र माझा 24 या न्यूज चॅनलचे संपादक म्हणून काम पाहत असून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे.लोकहिताशी निगडित प्रश्नांची जाण ठेवून त्यांनी पत्रकारितेला योग्य दिशा दिली आहे.पत्रकारितेतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान देण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समाजातील सत्यघटनांना वाचा फोडणे, अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड ही पाटील यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.या सोहळ्याद्वारे पत्रकारिता, समाजकार्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments