चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील माणगांव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिवाजीराव पाटील,माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले कि, शाश्वत विकासाला आताशी सुरुवात झाली असून,यापुढेही एक लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील सर्व गावांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न राहील.
यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती व सुशोभीकरण-२८ लाख,माणगांव गावठाण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरी बांधकाम -२० लाख,माणगांव गावठाणकडे जाणारा रस्ता खडीकरण-१० लाख,माणगांव येथे व्यायाम शाळा बांधकाम-१४ लाख,नाईक वस्तीतील रस्ता कॉंक्रेटीकरण १० लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असून अश्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सरपंच, पदाधिकारी, सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments