(आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजना 2023-24 मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक)
चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : मेहनत, एकजूट आणि स्वच्छतेचा संकल्प यांचा सुंदर संगम घडवून आणत चंदगड तालुक्यातील जांबरे गावाने जिल्हाभरात आपले नाव अजरामर केले आहे.आर.आर.(आबा)पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजना 2023-24 मध्ये जांबरे ग्रामपंचायतीने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे.या यशाने चंदगड तालुक्याच्या इतिहासात जांबरे गावाची सुवर्णअक्षरांनी नोंद घेण्यात आली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार धनंजय महाडिक,आमदार शिवाजीराव पाटील,जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांच्याहस्ते जांबरे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी गावकऱ्यांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू तरळले आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.
हा यशस्वीपणे पुरस्कार स्विकारताना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे,बी.डी.ओ. वृक्षाली यादव,सरपंच विष्णू गावडे,ग्रामविकास अधिकारी अश्विनी कुंभार,उपसरपंच रामकृष्ण गावडे,मुख्याध्यापक दीपक गोरे,पोलीस पाटील जानकू गावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य सई रेडकर, समृद्धी नाटलेकर, भागीरथी गावडे, संजना गावडे, सुभाष कांबळे, ज्ञानेश गावडे, माजी सरपंच प्राजक्ता गावडे, तसेच गावातील कार्यकर्ते व नागरिक राजू म्हाडगुत, गोविंद गोवेकर, अमित देवणे, संतोष रेडकर, नागेश गावडे, दिपाली गावडे, संजना निवगुरे, ऋतुजा (शांती) गावडे, दीप्ती गोवेकर, साहिल गावडे, वेदांत गावडे व आर्यन गोवेकर यांची उपस्थिती लक्षणीय होती.
गावातल्या प्रत्येक कुटुंबाने “माझं गाव माझी जबाबदारी” या भावनेने स्वच्छतेला आपली ओळख बनवली. कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, रस्त्यांची स्वच्छता, शाळा-गावसुंदर उपक्रम या सर्वांच्या माध्यमातून जांबरे आज जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहे.“हा सन्मान गावकऱ्यांचा आहे.जांबरे हे केवळ एक गाव नाही तर एक विचार आहे-स्वच्छतेतून विकासाकडे जाण्याचा मार्ग” असे गौरवोद्गार सरपंच विष्णू गावडे यांनी यावेळी काढले.
गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे सोने झाले आणि जांबरे गावाच्या कर्तृत्वाने संपूर्ण तालुका अभिमानाने उजळून निघाला आहे. हा पुरस्कार गावच्या पुढील वाटचालीस नवा उत्साह व प्रेरणादायी ठरणारा आहे.


Post a Comment
0 Comments