Type Here to Get Search Results !

माडखोलकरच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर टाकली वेगळी छाप



(जिल्हास्तरीय युवा महोत्सवात र. भा. माडखोलकरच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर टाकली वेगळी छाप, सर्वत्र कौतुक)


चंदगड/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात र. भा. माडखोलकरच्या विद्यार्थिनींचा सहभाग नोंदविला.गडहिंग्लज येथे पार पडलेल्या युवा महोत्सवमध्ये चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयाच्या मुलींनी धनगरी नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. अपुऱ्या पाठिंब्या अभावी देखील मोठ्या जिद्दीने मुलींनी स्वतः नृत्य शिकून आपल्या महाविद्यालयाचा झेंडा महोत्सवात फडकवण्यात मुलींनी यश मिळवले.प्रा. ए. डी कांबळे,अजय सातार्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यासोबत प्रश्नमंजुषा, समुहगीत यात देखील सहभाग घेतला.


भूमी कांबळे या विद्यार्थिनीने एकपात्री प्रयोग सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले.रोशन कुंभार यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचं विद्यार्थिनीने सांगितलं. इतर महाविद्यालयासारखा पाठींबा मिळाला तर या विद्यार्थिनीं नक्कीच आपलं,आपल्या महाविद्यालयच, आपल्या तालुक्याचे नाव अजून उंचावर घेऊन जाण्यास कुठेच मागे पडणार नाहीत.आम्हीं आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करत राहू असे उपस्थित विद्यार्थिनींनी सांगितले.

Post a Comment

0 Comments