Type Here to Get Search Results !

नेसरीमध्ये साकारला पुरातन काळातील शिव मंदिराचा देखावा


नेसरी/प्रतिनिधी : नेसरी येथील गणेश भक्त श्याम आनंदा सुतार यांनी कोवाड रोडवरील आनंद निवासात पर्यावरण पूरक घरगुती पुरातन शिवमंदिर गणेशाचा आकर्षक भव्य माती आणि शाडूचा अद्भुत देखावा साकारला आहे.गेल्या दीड महिन्यापासून सुतार यांनी देखावा साकारण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. बाप्पा एका काल्पनिक घनदाट जंगलातील निसर्गाच्या सानिध्यात वेलींची दाटी असलेल्या व पाण्याच्या खळखळाटाने मनाला प्रसन्न करणाऱ्या काल्पनिक दुर्लक्षित व पडक्या शिव मंदिरामध्ये दक्षिणात्य साधूंच्या वेशामध्ये चालून थकून जणू काही आपल्या वडिलांच्या मंदिरात म्हणजेच शिव मंदिरामध्ये विराजमान झाले असल्याचे चित्र उभे केले आहे.

    

हे शिवमंदिर पुरातन काळातील एक सुंदर मंदिर असून सध्या दुर्लक्षित झाल्यामुळे मोडकळीस आले आहे. भिंतींचा काही भाग कोसळल्याचे दिसत असून त्यातूनच जंगलातील पाहण्याचे झरे मंदिरात प्रवाहित झालेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शेवाळ तसेच छोटी झाडे झुडपे यांनी देखील अधिकार दाखविल्याचे चित्र या देखाव्यात पाहायला मिळते. देखावा पाहताना अनेक शतकापूर्वीचे पुरातन शिवमंदिर पहात असल्याचा भास होत असून गणेश भक्त आपल्या नयनात भावनिक नजरेतून देखाव्याचा लाभ घेताना मग्न होत आहेत.

Post a Comment

0 Comments