(बंधाऱ्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण,सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लोखंडी पाईप बसवावेत अशी नागरिकांची मागणी)
माणगाव (ता. चंदगड): माणगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील साईड गार्डचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी निखळून नेल्याने मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बंधाऱ्यावरून दररोज गावकऱ्यांसह शेतकरी, विद्यार्थी, वाहनचालक यांची मोठी वर्दळ असते. मात्र, साईड गार्ड नसल्यानं वाहन घसरल्यास थेट नदीपात्रात पडण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या बंधाऱ्याला सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले लोखंडी पाईप वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, तेच चोरट्यांच्या हाताला लागल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झालेच, पण जीवितासही धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ नवीन लोखंडी पाईप बसवून बंधाऱ्याला सुरक्षित करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments