(भिंती कोसळून लाखोंचे नुकसान,सुदैवाने जीवितहानी टळली)
चंदगड/प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे अलबादेवी येथे लक्ष्मण कृष्णा पाटील यांची राहत्या घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर प्रापंचिक साहित्याचे देखील भिंतीच्या ढिगार्याखाली अडकून नुकसान झाले आहे.सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याठिकाणी लक्ष्मण कृष्णा पाटील,त्यांची पत्नी,सुन,नातू हे सर्वजण बचावले.त्याचबरोबर ओमाना रामचंद्र कोले यांच्याही घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाकडून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी व घरकुल योजना अंतर्गत त्यांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Post a Comment
0 Comments