Type Here to Get Search Results !

चंदगड तालुक्यात ऍड.संतोष मळविकर यांच्यावरील तडीपार आदेश रद्द करण्याची मागणी


चंदगड (प्रतिनिधी) : ऍड.संतोष मळविकर यांच्यावरील तडीपार निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.ही निवेदन देण्याची मोहीम दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राबविण्यात येणार आहे. र.भा. माडखोलकर महाविद्यालयापासून कॉलेज रोडमार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत मार्गक्रमण करून तहसीलदारांना सामूहिक निवेदन दिले जाणार आहे.


स्थानिक पातळीवर ऍड.मळविकर यांच्यावर लादलेला तडीपार निर्णय अन्यायकारक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत असून तो निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments