आजरा/प्रतिनिधी : उत्तूर ता.आजरा येथे विघ्नहर्ता शासकीय व निम्नशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.उत्तूर या संस्थेच्या नूतन इमारत उदघाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.तसेच संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षक बँकेचे मा.संचालक रावसाहेब देसाई,आनंदराव जाधव,तानाजी सणगर ,शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे - पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील,सुनिल पाटील,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील,शिक्षक बँकेचे संचालक एस व्ही पाटील, शिवाजी बोलके,एकनाथ गिलबिले,संस्थेचे चेअरमन धनाजी रावण, व्हा. चेअरमन रवींद्र पाटील, गृह तारण संस्थेचे व्हा.चेअरमन उत्तम तुरंबेकर,अशोक देसाई,आनंदा राजाराम,विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचे संदीप कांबळे,नागेश सुतार,संतोष गुरव,चंद्रशेखर पाटील,संजीव नाईक ,युवा नेते शौनक देसाई यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक,शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments