Type Here to Get Search Results !

शिष्यवृत्ती व भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे-सचिन परब


चंदगड/प्रतिनिधी : आजचे विद्यार्थी भविष्याचा वेध घेऊन अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत.परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने प्रवेश प्रक्रियेवेळी अडचणी येत आहेत तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा विचार करून आपले शिष्यवृत्ती व भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र महत्त्वाचे असल्याचे कोल्हापूर जिल्हा समाजकल्याण विभागाचे जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे प्रशासकीय अधिकारी सचिन परब यांनी मत मांडले.ते नरसिंगराव भुजंगराव पाटील जुनिअर कॉलेज चंदगड व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र समिती यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमात बोलत होते. 


अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.पी.पाटील होते.स्वागत व प्रास्ताविक समानसंधी केंद्र समन्वयक प्रा.व्ही.बी.गावडे यांनी केले.यावेळी सचिन परब यांनी जात पडताळणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्याचे फायदे व बारावीनंतर जात पडताळणी प्रमाणपत्राचे महत्त्व तसेच कार्यालयीन प्रक्रिये बाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. 


यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य आर.पी.पाटील यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा विद्यार्थांनी पुरेपूर वापर करून घ्यावा तसेच आपल्या कॉलेजकडून जात पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रे तातडीने देण्यात येतील तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला प्रा.एस.एस.शेख, प्रा.ए.एस.नांदवडेकर,प्रा.एस.एस.नेवगे,प्रा.व्ही.व्ही.बोकडे,प्रा.आर.के.पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.यु.एम बोकडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments