चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील 22 गावांमध्ये 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे न मिळाल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास स्थानिक लोकांना त्रास होत आहे.यानिमित बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.1950 पूर्वीचे महसूल पुरावे कुरुंदवाड येथे होते.आणि 2005 च्या पुरामध्ये ते वाहून गेले.वास्तविक पाहता या जुन्या कागदपत्रांची योग्य ती काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु सरकारने याकडे लक्ष न दिल्यामुळे हि सर्व जुनीं कागदपत्रे खराब झाले आणि आता मात्र सरकारी अधिकारी आम्हाला 1950 पूर्वीच्याच महसूलचे पुरावे हवे अन्यथा आम्ही तुम्हाला जात प्रमाणपत्र देणार नाही असे सांगत आहेत.निश्चितच हा तेथील स्थानिक लोकांवरती अन्याय आहे.
सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून ही अट शिथिल करावी, कारण काही ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना 1958 नंतरची आहे.ज्या गावांना ही समस्या आहे त्या गावातील नागरिकांना 1960 पूर्वीचे महसूलचे पुरावे मागण्यात यावेत किंवा या अटींमध्ये सवलत द्यावी.जेणेकरून लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराचा उपभोग घेता येईल.या विषयाच्या अनुषंगाने बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने चंदगड तहसीलच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या सदर आंदोलनाला लोकांची संख्या,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने प्रा. प्रकाश नाग,अमित सुळेकर,विनायक खांडेकर,राजू पुंडलिक कांबळे यांनी केले.याप्रसंगी जोतिबा सुतार, नितीन सुतार,राहुल मोरे, नितीन राऊत, शरद पाटील, दयानंद कांबळे,राजू कांबळे, सदानंद कांबळे, गणपती गुंडू कांबळे,मष्णू लक्ष्मण कांबळे, मिलिंद रामचंद्र कांबळे, कल्लाप्पा परशुराम कांबळे, तसेच सुरूते, कागणी तुडये, गवसे, निटूर, म्हाळुंगे, कागणी, सातवणे, बुजवडे, मजरे कार्वे, खालसा गुडवळे, देवरवाडी या गावांमधून कार्यकर्ते उपस्थित होते.या आंदोलनानंतर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment
0 Comments