चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील कॉमर्स व अकाउंट्स विभागातील प्रा. पूजा चंद्रकांत देशपांडे यांनी अलीकडेच पार पडलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) मध्ये यश मिळवले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले, प्रा.“पूजाचे हे यश केवळ तिच्या मेहनतीचेच नाही तर संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. विद्यार्थिनींनी जिद्द व सातत्याने अभ्यास केल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे तिने दाखवून दिले आहे.”
पूजाच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले की, “तिने अत्यंत कष्टपूर्वक अभ्यास करून हे यश मिळवले आहे. तिचे करिअर आणखी उज्ज्वल व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.” या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी ,प्राध्यापकवर्ग, सहविद्यार्थी व स्थानिक मान्यवरांनी प्रा.पूजाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

Post a Comment
0 Comments