चंदगड/प्रतिनिधी : नांदवडे गावचे सुपुत्र ऍड. संतोष मळवीकर यांच्यावरील हद्दपारचा निर्णय झालेला असून मळवीकर यांनी गेल्या वीस वर्षात अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली.अनेक मोर्चे काढले,त्यांनी सर्व आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये सात वर्षे बंद असणारा दौलत सहकारी साखर कारखाना हलकर्णी चालू करण्यासाठी नेतृत्व केले आहे.ए.व्ही.एच.विनाशकारी प्रकल्प तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी नेतृत्व केले होते.तसेच अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील लोकपाल बिल आंदोलनात पाच दिवस दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत सक्रिय भाग घेतला होता.महाराष्ट्र राज्य परिवहन वाहतूक मंडळाच्या कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.व नागपूर अधिवेशनात मोर्चा करत इंडियन गॅस, दूध दरवाढ, शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई,विद्यार्थ्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार यावर वाच्या फोडणे अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना समाजाला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न केलेला असून त्यांनी स्वतःसाठी कसलाही विचार न करता समाजासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत.त्यांनी केलेल्या कार्यामधून त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेले असून वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी एकही गुन्हा नोंद नाही असे या निवेदनामध्ये म्हटलेले आहे.त्यांच्यावर खून,दरोडा,अत्याचार यासारख्या गंभीर गुन्हे दाखल नसून जे गुन्हे दाखल आहेत, ते समाजातील लोक आंदोलनातील आहेत.
याउलट त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेच्या वतीने अर्जुन पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.तसेच त्यांनी लिहिलेल्या 'सत्यांकुली' साहित्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला असून त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.त्याचप्रमाणे मळवीकर यांनी विविध आंदोलना बरोबरच फेसबुक लाईव्ह रोखठोक आवाज चॅनल व साप्ताहिका द्वारे विविध आंदोलने,फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण,वृक्ष संवर्धनासाठी चालू असलेले कार्य,मराठा आरक्षणासह अनेक ज्वलंत प्रश्नांचा वाचा फोडणे ही कामे त्यांनी केलेली आहेत.
एकंदरीत मळवीकर यांच्यावरील सर्व बाबींचा विचार करून सामाजिक कार्य लक्षात घेता यांच्यावर केलेली कारवाई लोकशाहीला घातक असून तडीपारची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी याकरिता जगमट्टी व इतर गावातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई,आर.पी. पाटील,शामराव मुरकुटे,हणमंत पाटील,अनिल होडगे,सुनील नाडगोंडा, दयानंद गावडे,सरपंच रेणुका कांबळे,उपसरपंच सट्टूप्पा साळुंखे, शाहू कांबळे, निवृत्ती गावडे,दीपक गावडे,ज्ञानदेव पाटील,राजू वर्पे, संतोष कांबळेसह आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments