उत्तूर/प्रतिनिधी : डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद,कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय,उत्तूर यांच्यावतीने आयोजित "कलाकार आपल्या भेटीला-कलाकारांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद" ही कार्यशाळा उत्तूर येथील वसंतरावदादा पाटील विद्यालयात उत्साहात पार पडली.उत्तूर येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कलाकारांशी हितगुज साजत कलाक्षेत्रात यशस्वी कसे होता येईल यांचे माहिती घेतली.
भविष्यात ग्रामीण भागातील बालकलाकारांना येणाऱ्या आगामी मालिका व चित्रपटासाठी नक्कीच संधी देऊ व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनने उपक्रम असून छान राबविला असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मत अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे यांनी व्यक्त केले.तर झी टीव्ही होम मिनिस्टर फेम एन.के बाबा यांनी आपण लिहलेल्या गाण्याचे सादरीकरण करत विद्यार्थ्यानी ध्येय व जिंद्दीच्या जोरावर यशस्वी होता येईल.ग्रामीण भागातच मोठे मोठे कलाकार लपलेला असतात,त्याचे उदाहरणासह माहिती देऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमाचे उदघाट्न लोकनियुक्त सरपंच किरण आमंणगी यांनी करून यासारख्या कार्यशाळातुनच आपल्याला नव-नवीन शिकण्यास मिळते.आजची कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून चित्रपट सृष्टीतील दादासाहेब फाळके हेही कोल्हापूर येथीलच असून त्यांनी चित्रपट सृष्टीचा पायाला रचला असे मत व्यक्त केले.युवा उद्योजक अश्विन भुजंग,ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर,सामाजिक कार्यकर्त्या अरुणा दोरुगडे,लोककला महोत्सव समिती कार्याध्यक्ष गणपती नागरपोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एस कांबळे हे होते.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सचिन पोवार यांनी केले.मुख्याध्यापक एच. एस. कांबळे, सदेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आर व्ही थोरवत,डी व्ही मोहिते, विठ्ठल कदम, आनंदा हसबे, उत्तम तोरगले, नितीन ससाणे,गडकरी ताई,तेजस्विनी पाटील,कल्पना भाईगडे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन एच. एस. हळवणकर यांनी तर आभार ए.व्ही. गुरव यांनी मानले.
Post a Comment
0 Comments