(गणेशोत्सव काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने सातवणे ग्रामस्थांकडून सत्कार)
चंदगड/प्रतिनिधी : सातवणे येथे गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीसह हलत्या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी आठ दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होती.उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी चंदगड पोलीस ठाण्यामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सातवणे गावाला भेट देऊन पोलीस कर्मचारी व होमगार्ड जागोजागी गर्दीच्या ठिकाणी दिले.त्यामुळे सातवणे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी विश्वास पाटील यांनी आपल्या मनोगतात "सातवणे गाव हे देखाव्याचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे,येथे गणेशाची महिमा फार मोठ्या प्रमाणात केला जाते.गावातील लोक फार उत्साही आहेत,इच्छाकांक्षी आहेत.सातवणे गावात गणेश भक्तांची गर्दी पाहून आम्हाला आनंद होतो.सातवणे गावाचे नाव महाराष्ट्राबाहेर जात आहे त्यामुळे ग्रामस्थांचा अभिमान वाटत आहे यासाठी आम्हाला ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील,मंडळाचे अध्यक्ष,तरुण कार्यकर्ते यांचे आम्हाला सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले .
Post a Comment
0 Comments