Type Here to Get Search Results !

बिद्रेवाडी गावातील तरुणाईने शाळेबद्दल व्यक्त केली कृतज्ञता


नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती विद्या मंदिर बिद्रेवाडी येथे शिक्षक,विद्यार्थी व जय हनुमान कला क्रीडा मंडळ संलग्न टायगर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी तरुण मुलांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.शाळेचे मुख्याध्यापक  बाळाराम शिपुरकर यांना शिक्षक समितीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 


यावेळी माजी उपसरपंच दुर्गाप्पा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.जयंतीनिमित्त वसंत नाईक,जिवबा नाईक,दत्ता नाईक,राजेंद्र नाईक,नारायण नाईक, सुनिल पाटील,दता पाटील ,परशराम नाईक पुंडलिक नाईक, तुकाराम सुतार, पुंडलिक पांडूरंग नाईक ,कलावती नाईक, अभिजीत नाईक, सूरज नाईक ,ज्ञानेश्वर नाईक, नीरज नाईक आदि बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments