Type Here to Get Search Results !

नागवे येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील नागवे येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


या समारंभाला चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ,सरपंच मनिषा देशपांडे,ॲड.विजय कडुकर,उद्योजक लक्ष्मण गावडे,मारुती नाडगोडा,प्रकाश कांबळे,सरिता सामंत,निर्मला गुरव,संदीप गावडे,गुंडू गुरव,अक्षय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामपंचायत कार्यालयासारखी महत्त्वाची सुविधा गावात उभारली जाणार असल्यामुळे ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी या इमारतीमुळे गावातील शासकीय कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावीपणे होणार असल्याचे मत व्यक्त केले.नूतन ग्रामपंचायत इमारत गावाच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाच ठरेल,असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments