चंदगड/प्रतिनिधी : अडकुर ता.चंदगड येथे ऊस पिकावरील किड व रोग नियंत्रण यावर शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंगलज व तालुका कृषी अधिकारी चंदगड यांच्या माध्यमातून घेतलेल्या प्रशिक्षणात प्र.मंडळ कृषी अधिकारी डी.बी.जाधव यांनी ऊस पिकावरील कीड रोग व्यवस्थापन,विशषता लोकरी मावा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच कल्लाप्पा गुरव होते.सहाय्यक कृषी अधिकारी अनिल कुटे यांनी देखील ऊस,आधुनिक तंत्रज्ञान,हवामान बदलामूळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम व महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, "उस पिक उसावरील "लोकारी मावा" म्हणजे लोकरी मावा (सेराटोवाकुना लॅनिगेरा), एक रस शोषक कीटक जो स्वतःला पांढऱ्या, लोकरी मेणाने झाकतो आणि उसाच्या पानांखाली लपतो. ही कीटक वनस्पतीच्या रसावर खातात, ज्यामुळे पिवळे डाग पडतात, पाने सुकतात,उत्पादन कमी होते आणि साखरेचे प्रमाण कमी होते. त्याच्या उपस्थितीमुळे काळ्या काजळीच्या बुरशीचा दुय्यम प्रादुर्भाव देखील होऊ शकतो.त्याचबरोबर एकात्मिक कीटक व्यवस्थापन पद्धतींचे संयोजन सर्वात प्रभावी" असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.
कृषी सहाय्यक अधिकारी संतोष किरवले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.रवळनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष बबनराव देसाई यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments