Type Here to Get Search Results !

दुचाकी अपघातात कोवाडचा युवक ठार


चंदगड प्रतिनिधी/भरमु शिंदे : दुचाकी अपघातात होसूर येथील ओढ्याजवळ कोवाडचा युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी उघड झाल्याने याप्रकरणी नोंद चंदगड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नरसु अशोक आढाव वय (32) असे मृत युवकाचे नाव आहे.


नरसू रविवारी सायंकाळी मार्केटला जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला होता,त्यानंतर दोन दिवस तो घरी आलाच नाही कुटुंबीयांनी इकडे तिकडे व पाहुण्यांच्या घरी शोधाशोध केली पण त्यांत नरसूचा पत्ता त्यांना लागलाच नाही. त्यात मंगळवारी रमेश जाधव यांना होसूरच्या ओढ्याच्या वरच्या बाजूस त्याची दु-चाकी त्या बाजूला तो पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी लागलीच त्यांच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली.त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी येऊन पाहिले असता तो जागीच ठार झाल्याचे त्यांना आढळले.त्यानंतर चंदगड पोलिसात या अपघाताची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे करत आहे. नरसूच्या पक्षात पत्नी, एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments