चंदगड : “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या जीवनात सुवर्ण संधी आहे. ती फक्त समाजसेवा शिकवत नाही तर आदर्श नागरिक घडवते, आत्मविश्वास वाढवते आणि नेतृत्वगुण विकसित करते,” असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते.
डॉ. जाधव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की, “NSS मध्ये केलेले छोटे प्रयत्न देखील समाजात मोठा बदल घडवू शकतात. एका खेड्यात पाणी अडवा–पाणी जिरवा मोहिमेत स्वयंसेवकांनी गावातील पाणी टंचाई दूर केली. तुमच्या प्रत्येक सेवाभावातून समाजासाठी दीपस्तंभ निर्माण होतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना NSS ची खरी शक्ती, जबाबदारी, संघभावना आणि मानवी मूल्ये जोपासण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले की, “NSS विद्यार्थ्यांना समाजाशी जोडते, देशाच्या प्रगतीत सहभागी बनवते. ही संधी गमवू नका.”
प्रास्ताविक डॉ. एस. डी. गावडे यांनी NSS दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. “NSS हा अनुभव जीवनमूल्ये शिकवतो,” असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली व समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.विशेष म्हणजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या अमित गावडे याची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रा व्ही के गावडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रा. एम. एस. दिवटे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. आर. के. सूर्यवंशी, प्रा. सोनाली पाटील आणि अनिल पाटील यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments