आमदार जयंत आसगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट
(शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा – ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था, सोयीसुविधा आणि विकासावर भर,गेल्या पाच वर्षांत मार्गी लावलेल्या विकासकामांची माहिती आमदारांनी पवारांना दिली)
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदार जयंत आसगावकर यांनी भेट घेतली. यावेळी आमदार आसगावकर यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.भेटीदरम्यान शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उभाराव्यात तसेच उच्च शिक्षणासाठी आवश्यक संधी उपलब्ध व्हाव्यात यावर विशेष भर देण्यात आला.
आमदार आसगावकर यांनी आपल्या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मार्गी लावलेल्या कामांची माहिती शरद पवार यांना दिली. शैक्षणिक संस्था उभारणे, शाळांच्या इमारती दुरुस्त करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करणे, तसेच विविध विकासकामे कशी गतीमान झाली याचा आढावा त्यांनी मांडला.या चर्चेत पवार यांनी शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे मुख्य साधन असल्याचे सांगून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.या भेटीमुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे प्रश्न पुढे आले असून, त्यावर भविष्यात ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments