Type Here to Get Search Results !

र.भा.माडखोलकर महाविद्यालयात हिंदी दिन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा


चंदगड : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिन सप्ताहानिमित्त निबंध, सामान्य ज्ञान, काव्यवाचन व हस्तलेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.


प्रास्ताविक करताना हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. हिंदी ही केवळ राष्ट्रभाषा नसून देशाच्या एकतेचे व सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात करून ती व्यवहारात रुजवली, तर भाषेची खरी प्रगती होईल.”


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. आभार प्रदर्शन डॉ. आर. के. सूर्यवंशी यांनी केले.यावेळी डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. अरुण जाधव, प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, अनिल पाटील,अभिषेक कांबळे व शोभा चंदगडकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments