चंदगड/प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक शाळांना अचानक दिलेल्या भेटीमुळे प्राथमिक शाळांची परिस्थिती बघून आमदार शिवाजी पाटील यांनी शाळा अद्यावत करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना सन 2025 -26 या वर्षात प्राथमिक शिक्षण विभागामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज आजरा चंदगड येथे विशेष शाळा दुरुस्ती व वर्ग खोल्या बांधण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी नऊ कोटी 90 लाखाचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती दिली. या निधीमुळे तिनी तालुक्यातील शाळा आता दिमाखात उभी राहणार असून शिक्षणासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशी अशा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments