(कर्मचारी व संचालकांना कुटुंबाचा भाग मानणारी सामाजिक जाण-“गोड दिवाळी”चा उपक्रम,गोकुळ परिवारात आनंदाची लहर-चिलिंग सेंटर कर्मचाऱ्यांनाही भेटवस्तूंचे वाटप)
गोकुळ दूधसंस्थेच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी यावर्षीही आपली परंपरा कायम ठेवत गोकुळ परिवारातील सदस्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील गोकुळच्या दूध संस्थांना तसेच चिलिंग सेंटरमधील कर्मचारी व संचालकांना दिवाळी भेटवस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले.
रेडेकर ताई या गोकुळ संचालिका झाल्यापासून सतत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व दूध संस्थांशी सखोल आत्मीयता जपताना दिसतात. त्या दूध संस्थांतील कर्मचारी, सुपरवायझर, संचालक आणि चिलिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांना “आपल्या कुटुंबाचा भाग” मानतात. या भावनेतूनच प्रत्येक वर्षी सणासुदीच्या काळात त्या सर्वांना भेटवस्तू देण्याचा सामाजिक आणि मानवी संवेदनेने परिपूर्ण उपक्रम राबवतात.यावर्षीही दिवाळीपूर्वीच सुपरवायझर व कार्यकर्त्यांमार्फत सर्व संस्थांना दिवाळी भेटवस्तू व मिठाईचे वितरण करण्यात आले. तसेच चंदगड व गडहिंग्लज भागातील चिलिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांनाही मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली.
या उपक्रमामुळे गोकुळ परिवारात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कर्मचाऱ्यांनी संचालिका रेडेकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “गोकुळ परिवाराला दिवाळीचा खरा आनंद देणारी संचालिका” अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.रेडेकर ताईच्या या सातत्यपूर्ण व संवेदनशील कार्याबद्दल स्थानिक समाज व सहकारी क्षेत्रातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ डेअरी केवळ आर्थिक नव्हे तर मानवी मूल्यांवर आधारित सहकाराची संस्कृती जपत आहे, हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

Post a Comment
0 Comments