श्री.नरसिंह देवालयाला माजी आमदार राजेश पाटील यांची भेट!
चंदगड/प्रतिनिधी : म्हाळेवाडी-निटूर पंचक्रोशीतील प्राचीन व जागरूक देवस्थान श्री.नरसिंह देवालय (नरसोबा), निटूर येथे मोठ्या श्रद्धा व उत्साहात दसरा उत्सव संपन्न झाला.पारंपरिक रितीरिवाज, पूजा-अर्चा व धार्मिक विधींच्या गजरात हा सोहळा पार पडला.
यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी सहपरिवार देवालयात हजेरी लावून श्री.नरसिंह देवांचे मनोभावे दर्शन घेतले.दर्शनानंतर त्यांनी भक्तांसोबत संवाद साधत समाज एकतेचा व परंपरा जपण्याचा संदेश दिला.
दसरा उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, पूजा तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा दसरा सोहळा पार पडला.याप्रसंगी पंचक्रोशीतील मानकरी, गावातील सरपंच,ग्रामस्थ,तसेच अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments