मनोरंजन/कलाविश्व : ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची दमदार भूमिका साकारल्यानंतर अक्षय खन्ना पुन्हा नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या आगामी ‘महाकाली’ चित्रपटात अक्षय खन्ना असुरगुरु शुक्राचार्यची भूमिका साकारणार आहे.प्रशांत वर्मा यांनी नुकताच अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. पांढरा पोशाख, लांबसडक पांढरे केस आणि कपाळावरचा टिळा यामध्ये त्याला ओळखणे कठीण आहे. अंगावर शहारे आणणारा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
‘छावा’नंतर अक्षयची ही भूमिका प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक उंचावणारी ठरली आहे. भारतीय पुराणातील महत्त्वपूर्ण पात्र असलेल्या शुक्राचार्याची भूमिका साकारणे हे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.चित्रपटातील इतर कलाकार आणि प्रदर्शन तारखेची माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments