Type Here to Get Search Results !

कालकुंद्री येथील केंद्रीय प्राथमिक शाळेकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी


चंदगड/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कालकुंद्री ( चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने गावातून मदत फेरी काढण्यात आली.या फेरीला कालकुंद्री ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अंदाजे जवळ-जवळ 4 क्विंटल तांदूळ जमा केला.तांदळाबरोबर तेल,डाळ,साखर अशा वस्तूही दिल्या. 


मुलांच्यावर सामाजिक मदतीची भावना/ संस्कार रुजविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक स्टाफच्या वतीने या मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते."शेतकरी जगला,तरच देश टिकेल,एक मूठ धान्य पूरग्रस्तासाठी,बळीराजा हाच जगाचा पोशिंदा,जय जवान -जय किसान "अशा घोषणांचे फलक हातात घेत सर्व गल्ल्यातून जात लोकांना पूरग्रस्तांना धान्याच्या  स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले. 


या लहान मुलांची तळमळ पाहून सगळ्या घरातून मदत प्राप्त झाली.ही मदत भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रोहित देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्फत ही मदत मराठवाड्याकडे पाठविली जाणार आहे.यावेळी उपसरपंच संभाजी पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर,उपाध्यक्ष भरमु पाटील , मुख्याध्यापक पुंडलिक गुरव , राजेश काटकर , म्हात्रू गावडे , शिवाजी भरणकर,कोमल शेटजी , शरद जोशी , दुद्दाप्पा पाटील,अन्वर  शेख, शशिकांत सुतार, मैनुद्दीन शेख , अबुल मोमीन  यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीने मदत फेरीची माहिती लोकांच्या पर्यंत पोचवून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. रवींद्र पाटील यांनी गावातून धान्य गोळा करण्यासाठी आपला ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून दिला.शाळकरी मुलांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments