(पाटणे फाटा येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेचे उद्घाटन)
चंदगड/प्रतिनिधी : गृहतारण संस्था म्हणजे सामान्यांचा आधारवड असल्याचे मनोगत डॉक्टर परशराम पाटील यांनी व्यक्त केली.ते पाटणे फाटा येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्थेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.डॉ.परशराम पाटील म्हणाले गोरगरीब लोकांना सध्याच्या काळात घर बांधणे म्हणजे एक स्वप्न ठरत असून या संस्थेमुळे त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.
प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतुपूर्ण कांबळे यांनी करून 2020 साली स्थापन झालेल्या या संस्थेचा आढावा घेत असताना तीस कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगितले. तसेच आपल्या संस्थेकडून वाहन तारण, गृहतारण,सोनेतारण व व्यापारी वर्गांसाठी पिग्मी च्या माध्यमातून कर्ज देण्याची सुविधा असल्याचे सांगून संस्थेमार्फत चालू असलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे व डॉ. परशराम पाटील यांच्याहस्ते नवनिर्वाचित संचालक व उपस्थित मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी चंदगड तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी, शिवाजी तुपारे, पांडुरंग बेनके, मोहन पाटील, जी. वाय. कांबळे, एम. टी. कांबळे, राजू जोशी, गोविंद गावडे, महादेव कांबळे यांच्यासह शाखा सल्लागार, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.पुंडलिक कांबळे यांनी आभार मानले.



Post a Comment
0 Comments