नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : कै.शिवराम रामा भारती व कै.लक्ष्मीबाई शिवराम भारती यांच्या पुण्यतिथी निमित्त व कै.डॉ.गणपती शिवराम भारती व कै छाया गणपती भारती त्यांच्या स्मरणार्थ शिवलक्ष्मी निवास तारेवाडी तालुका गडहिंग्लज येथे शनिवार दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे सकाळी 11 वाजलेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये १) नेत्रोपचार व शस्त्रक्रिया मोतीबिंदू व इतर डोळ्यांचे आजार २) मोतीबिंदू साठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया अल्प खर्चात ३) शिबिरामध्ये चष्म्याचे नंबर काढून अल्प दरात चष्मे तयार करून मिळतील ४) अंगदुखी पाठ दुखी अशक्तपणा थंडी ताप व मधुमेहामुळे होणाऱ्या त्रासाची तपासणी करून योग्य औषध उपचार केले जातील ५) आरोग्य तपासणी करून सर्व आजारावर योग्य मार्गदर्शन उपचार केले जातील व शिबिरात काही औषध मोफत दिली जातील तसेच शिबिरात तपासलेल्या रुग्णांना पुढील उपचाराची गरज असल्यास पुढील उपचार अल्प दरात केले जातील
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तज्ञ डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल व अंकुर डोळ्यांचे हॉस्पिटल गडहिंग्लज व केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज येथील तज्ञ डॉक्टरांच्या कडून तपासणी होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे संयोजक जी एस भारती चारिटेबल ट्रस्ट मिरज,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ तारेवाडी व भारती परिवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments