आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : तडशिनहाळ ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला सौ.अनुसया मारुती दरेकर , वय 65 वर्षे यांचे रविवार दिनांक 05 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वा.30 मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा अल्प परिचय थोडक्यात. स्व.सौ. अनुसया दरेकर यांचा स्वभाव साधा, मनमिळावू व प्रेमळ असा होता.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायच्या.त्यांना भजनाची खूप आवड होती.त्या भजनही म्हणत असत.तर त्यांनी ग्रामपंचायत तडशिनहाळ चे सदस्य पद ही उल्लेखनीय रित्या सांभाळले होते.त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली.त्यांचे दिवस कार्य बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.
आमच्या मातोश्री सौ. सौ.अनुसया मारुती दरेकर , वय 65 वर्षे यांचे रविवार दिनांक 05 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार,शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर ,सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य , गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य,यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा दरेकर परिवार ऋणी आहे.
महाराष्ट्र माझा 24 परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली!
शोकाकुल परिवार -
पती मारुती संचालक बलभीम दूध संस्था तडशिनहाळ,मुले गणपत माजी सैनिक, प्राध्यापक पुंडलिक श्रीमान व्हि.पी.देसाई ज्युनिअर कॉलेज कोवाड,सुना सौ.प्रगती,सौ. पल्लवी शिक्षिका, नातवंडे संजना,स्वप्नील,आदित्य, निहारिका दरेकर.समस्त दरेकर परिवार तडशिनहाळ.
Post a Comment
0 Comments